विज्ञान म्हणजे तरी काय? तर, निसर्गाच्या, सृष्टीच्या - आधीच अस्तित्त्वात असलेल्या गोष्टींना आपण तथाकथित 'शोध' लावून फक्त नियमात बसवले. दुसरे काहीच नाही.
वरील समजूत चूक नाही. उदाहरणादाखल सांगतो.
वाफेचे इंजिन, डिझेल इंजिन - वाफ, अणूरेणू व त्यांचे गुणधर्म हे माणसाने आणि विज्ञानाने बनवले नाहीत. वाफ आधीपासूनच होती. आपण तीचे गुणधर्म अभ्यासले आणि त्याचा फक्त वापर केला.
दळणवळणाची आधुनिक साधने - समजा उदाहरणादाखल बाईक घेवू. बाईक कशामुळे चालते? मुळ तत्त्व आहे इंधन जाळणे व त्याच्या आधारे तयार झालेल्या दबावाचा वापर करून पिस्टन ची हालचाल करून त्याद्वारे चाक फिरवणे. इंधन हे आधीपासूनच पृथ्वीच्या पोटात होते. आपण नाही बनवले. पदर्थांची ज्वलनशिलता हा गुणधर्म मानवाने आणि विज्ञानाने पदार्थाला नाही दिला! तो आधीच होता.
वीजनिर्मिती, अनेकविध वीजेवर चालणारी उपकरणे - काही पदार्थांत मुळातच असलेले चुंबकीय गुणधर्म आपण विचार करून फक्त वापरले. दोन चुंबकांमधून विद्युतवाहक तार गतीने फिरवली की त्या तारेत विद्युत तयार होते. वरोबर? तांब्याच्या तारेला हा वाहकाचा गुणधर्म कोणी दिला? तो आधीच होता.
आधुनिक शस्त्रक्रिया/चिकित्सा - मानवी शरिराची रचना विज्ञानाने नाही केली व येणाऱ्या हजारो वर्षांत पण ते शक्य नाही. विज्ञानाने फक्त रचनेचा अभ्यास केला. व उपाय शोधले. शरीर रचना अनंत काळापासून तीच आहे.
""आधीच अस्तित्त्वात असलेल्या गोष्टींना आपण तथाकथित 'शोध' लावून फक्त नियमात बसवले. दुसरे काहीच नाही."
ही समजूत चुकीची कशी? कृपया सांगावे!