आधीच अस्तित्त्वात असलेल्या गोष्टींना आपण तथाकथित 'शोध' लावून फक्त नियमात बसवले. दुसरे काहीच नाही.

शोधांना विज्ञानाने नियमांत बसवले असे नव्हे ते निसर्गाच्या नियमांचा शोध घेऊन त्यांचा वापर आपल्याला मदत होईल अशाप्रकारे केला. हे करण्यापूर्वीही नियम अस्तित्वात होतेच, ते विज्ञानाने निर्माण केले नाहीत आणि तसा कधी दावाही केला नाही. विज्ञानाला आज ज्या मर्यादा आहेत त्या काही काळाने कमी होऊ शकतील.
विज्ञान आणि अध्यात्म ह्यांमध्ये अध्यात्म कसे श्रेष्ठ आणि विज्ञान कसे कनिष्ठ असे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे असे तुमचे प्रतिसाद वाचून वाटले. जर तुमच्या मते विज्ञान आणि अध्यात्माची तुलनाच अयोग्य असेल तर मग त्यातील एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ कसे असू शकते? काही गोष्टी विज्ञानाला अजून तरी समजलेल्या नाहीत हे सर्वांनाच मान्य आहे.
विश्व कसे निर्माण झाले ह्याचे उत्तर बऱ्याच प्रमाणात आज विज्ञान देऊ शकते. का? निर्माण झाले ह्याचे संपूर्ण उत्तर अजून मिळालेले नाही, मात्र
उत्तर मिळवण्याचे प्रयत्न विज्ञानामध्ये चालू आहेत. तुम्ही करता तशी तुलना कराचीच म्हटली तर विश्व, पृथ्वी, मानव वगैरे सर्व का निर्माण झाले ह्याचे उत्तर अध्यात्माला देता येते का? आणि नसेल, तर ते मिळवण्यासाठी अध्यात्मामध्ये काही प्रयत्न चालू आहेत का? कोणते?