वरदाताई,
आपला प्रतिसाद आवडला...
जर तुमच्या मते विज्ञान आणि अध्यात्माची तुलनाच अयोग्य असेल तर मग त्यातील एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ कसे असू शकते?
मस्त!
तुलना कराचीच म्हटली तर विश्व, पृथ्वी, मानव वगैरे सर्व का निर्माण झाले ह्याचे उत्तर अध्यात्माला देता येते का? आणि नसेल, तर ते मिळवण्यासाठी अध्यात्मामध्ये काही प्रयत्न चालू आहेत का? कोणते?
हेही मस्त!
निमिषराव (आणि इतर 'आध्यात्मिक', जे हिरीरीने विज्ञानाचे (सर्व विज्ञानवाद्यांना आधीच मान्य असलेले) अपूर्णत्व सिद्ध करत अध्यात्म आणि विज्ञानाची तुलना करू पाहतात),
अहो, तुम्ही ह्या चर्चेची सुरुवातच मुळी करता ती तुलना अयोग्य आहे म्हणून आणि आता तुम्हीच स्वतः तुलना करू लागलात! (असें दुटप्पीं वर्तन आम्हीं खपवून घेणार नाहीं म्हंटलें...) (तुम्ही कदाचित खूप चांगले राजकारणी१ (किंवा हल्लीच्या काळात, पत्रकार) होऊ शकाल.)
मी ह्या चर्चेत आधीही कधीतरी लिहिले होते की विज्ञान जरी परिपूर्ण नसले तरी तेच ह्या विश्वाचा अर्थ उलगडणारे सर्वात जास्त स्वीकारार्ह तत्त्वज्ञान आहे.
विज्ञानाने कधीही सर्व प्रश्नांचा उलगडा केल्याचा दावा केला नाहीये. (आणि विज्ञान जर परिपूर्ण झाले तर काही मजाच राहणार नाही.)
वरदाताईंनी प्रतिसादाच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची कृपा करावी. (आता चेंडू तुमच्या न्यायालयात आहे.)२
कश्रअ,
- चैत रे चैत.
१ह्या कल्पनेला मी खरंतर खूप कंटाळलोय. ही मला त्या 'राममून पांडुकलर डूडायडू'ची गंमत सांगणाऱ्या म्हाताऱ्यांसारखी एकदम बोऽर वाटते! पण off-hand काही चांगलं सुचलं नाही. (त्यातल्या त्यात पुढची पत्रकाराची कल्पना थोडीशी नवीकोरी वाटते. (फारतर, ८-१० वेळा घातलेल्या, ३-४ वेळा पाण्याने धुतलेल्या आणि एखाद वेळेस ड्रायक्लीन केलेल्या नव्याकोऱ्या साडीसारखी...) असो...)
२हे 'now the ball is in your court' ह्या इंग्लिश वाक्प्रयोगाचे अत्यंत भिकार असे भाषांतर होते... हल्लीच्या मराठी मालिका आणि हिंदीतून मराठीत भाषांतरित झालेल्या जाहिराती पाहण्याचा परिणाम आहे हा बहुतेक! हेही असोच...