वर्जः(संस्कृत नाम)---त्याग; (अव्यय) खेरीज.

वर्ज/वर्जित(मराठी विशेषण)--त्यागलेला. खोकला आला असता तेलकट पदार्थ वर्ज करावेत. अमुक पदार्थ मला वर्ज       आहेत. बुधवार प्रवासासाठी वर्ज(दिवस) आहे. 

वर्जनीय/वर्ज्य(संस्कृत-मराठी)--वगळण्यास/टाकण्यास योग्य.

वर्जन(सं.म.)--टाळणे(नाम)

वावडे(नाम)-- [मूळ संस्कृत व्यावृत्तक.] अयोग्य, कुपथ्य, हानिकारक(शब्दकोशातले अर्थ).

अपथ्य-कुपथ्यात अर्थामध्ये फारसा फरक नाही, पण केला तर तो असा:- अलिखित-न लिहिलेले; कुलिखित-वाईट लिहिलेले. असंवाद-अबोला; कुसंवाद- वाईट संभाषण. तसे अपथ्य- जे खाऊ नये आणि खाल्लेले नाही ते.  कुपथ्य--जे खायला नको होते ते.  अमुक गोष्ट मला अपथ्य आहे.  ती गोष्ट खाऊन मी कुपथ्य केले.

इंग्रजीतही अमुक पुरुषाला स्वयंपाक करायची ऍलर्जी आहे; तमुक बाईला गप्पा मारण्याची ऍलर्जी आहे असे म्हणतात.

तसे स्वैर अर्थाने वावडे म्हणजे नापसंती/नावड असे म्हटले जाते. आपण इथे 'वावडे'चा पारिभाषिक अर्थ विचारात घेत आहोत.