अपेक्षा बहुधा व्यक्तीकडून असते. त्यामुळे ती पुरी न झाल्यास वाईट तर वाटतेच पण त्या व्यक्तीविषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.पाऊस पडेल अशी आशा करतो इथे अपेक्षा शब्द वापरणे बरोबर नाही कारण ही अपेक्षा   कुणाकडून करायची ? मालकाकडून पगारवाढीची अपेक्षा असल्यामुळे ती पुरी न झाल्यास मालकाचा राग येतो अर्थात त्यावेळी तो  कामाविषयी त्याने तुमच्याकडून केलेली अपेक्षा तुम्ही पुरी केली नाही असा दावा करू शकतो.