सुभाष आणि सुरेश ह्या नावांमधला गोंधळ तसा बऱ्याच वेळा होतो असे दिसते. आयायटीत एका प्राध्यापकांचे नाव सुभाष... असे होते. त्यांचा उल्लेख दुसरे एक प्राध्यापक चुकून सुरेश... असा करीत असत.
माझ्याकडून बऱ्याच काळापासून बऱ्याच वेळा बऱ्याच बाबतीत असे होते आहे असे दिसते. लहानपणी 'मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा' ह्या तांब्यांच्या कवितेतली 'असक्त परि तू केलीस वणवण' ही ओळी मी 'अशक्त परि तू केलीस वणवण' अशी म्हणत असे. त्या वयात 'अशक्त असून वणवण करणे' हे अधिक योग्य वाटणे साहजिक असावे. पाडगावकरांची 'क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती' ही ओळ मी 'शुभ्र लौकिकाची खोटी झुगारून नीती' अशी गुणगुणत असे. नुसती घाई आणि वेंधळेपणा ह्यो दोन्ही गोष्टींचा संगम. दुसरे काही नाही.