सर्वात प्रथम छत्रपती शिवाजीमहाराजांना विनम्र अभिवादन....
..............
मा. कुमार केतकर यांचा तो अग्रलेख म्हणजे वक्रोक्ती अलंकाराचा उत्कृष्ट नमुना होय. उपरोधात्मक अशा त्या अग्रलेखाचा सारा रोख होता तो महाराष्ट्रातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तारूढ आघाडीवर आणि या आघाडी सरकारच्या कारभारावर. छत्रपती शिवाजीमहाराजांवर हा रोख निश्चितच नव्हता. असूही शकत नाही. या अग्रलेखाचे निमित्त होते...अरबी समुद्रात उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजीमहाराज यांचा भव्यदिव्य पुतळा.
सध्या आपल्यापुढील परिस्थिती काय आहे, आपले प्रश्न काय आहेत आणि या सरकारचे काय चालले आहे.....हे दाखवून देणारा तो अग्रलेख आहे. केतकर यांनी अग्रलेखासाठी मार्ग वापरला तो वक्रोक्तीचा, उपरोधाचा आणि इथेच सारे बिघडले, असे म्हणता येईल. वक्रोक्ती, व्याजोक्ती, अन्योक्ती... हल्लेखोरांना हे असले - मराठी भाषेतील अलंकार - थोडेच माहीत असणार ? शाळा-कॉलेजात हे अलंकार ते शिकले असते, तर नसता केला कदाचित त्यांनी हल्ला !!! अलंकार म्हटले की केवळ सोने, चांदी...आणि आताच्या काळात हिरे....एवढेच !
.................
आता सरकारची या हल्लेखारांबाबतची भूमिका - एखादा गूढ, रहस्यमय चित्रपट पाहताना जसे, शेवटी काय होणार, याची उत्कंठा असते, तशीच उत्कंठा या प्रकरणाच्या शेवटाबद्दल सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे....
मलाही विचारावेसे वाटते की - शेवटी काय होणार ?
.................