आज खूप बोलावंसं वाटतंय....

मौनी,
तुम्हाला आज खूप बोलावंसं वाटतंय....? छान...छान...जे बोललात, ते खूपच छान आहे. अतिशय सुंदर कविता...अप्रतिम.
मुक्तछंद कविता अशी असावी.
शुभेच्छा...
............
तुमची गेल्या वेळची छंदोबद्ध कविता (पत्र) मला आवडली नव्हती. :)
निमित्त केवळ जलधारांचे; गगनाची धरणीस मिठी  ही ओळ मात्र जबरदस्त होती.
शब्दांचा खूपच पसारा घातला होता, तुम्ही पत्र मध्ये. बाईविना बाबाच्या घरात जसा रहाडा पडलेला असतो, ना तसा. पण प्रयत्न ठीक म्हणायचा....असो. जे आणि जसे वाटले, ते आणि तसे (च) लिहिल्याबद्दल राग नसावा.
तुमच्या (छंदोबद्ध) काव्यलेखनाला माझ्या मनापासून शुभेच्छा. (छंदोबद्ध कविता) लिहीत राहा.