माझ्यामते पावसाचीही अपेक्षा करता येते, वातावरणाकडून. केव्हा? जेव्हा आकाशात काळ्या पावसाळी ढगांची गर्दी झालेली असते, हवा कुंद असते तेव्हा. हे जेव्हा नसेल पण पावसाची गरज असेल तेव्हा अपेक्षा करता येत नाही, केवळ आशा करता येते.
थोडक्यात काय व्हावे? हा विचार म्हणजे आशा, तर काय होईल? हा विचार म्हणजे अपेक्षा.
अपेक्षा ही (तुमच्या/माझ्या/समाजाच्या/पदार्थाच्या/वातावरणाच्या) गुणधर्मांवर आणि क्षमतेवर अवलंबून असते. आशेला क्षमतेचे बंधन नसते, फार तर इच्छेची वा गरजेची आवश्यकता असते असे म्हणता येईल.