मी यापुर्वी "अध्यात्म आणि विज्ञान : अयोग्य तुलना" या चर्चेतही हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता.
पण तुमच्या सारखे संक्षेपात मांडता आले नाही हे प्रांजळपणे कबूल करतो बुवा.

अध्यात्म म्हणजे काय अन् त्याचे कार्यक्षेत्र कोणते हे समजून घेतल्यावरच पुढे - तुलना करणे योग्य अथवा नाही/कोणत्या प्रश्नाची उत्तरे अध्यात्म देऊ शकेल, याकडे बघणे योग्य ठरेल.

मला वाटते, अध्यात्माला कुणाचा विरोध नसून अध्यात्माच्या नावाने भोंदूगिरी करणाऱ्या लोकांना विरोध आहे. अन् ते असणे साहजिक आहे. अध्यात्म म्हणजे जर स्वतःचा शोध घेण्याचा मार्ग असेल तर त्यास विरोध करण्याचे कारणच काय? त्या मार्गावर जायचे अथवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तो मार्ग योग्य आहे अथवा नाही हा वेगळाच चर्चेचा विषय आहे.