'शिव' ही दोन अक्षरे आपल्या नावामागे लावावीत आणि जगात काहीही करण्याचे लायसन मिळवावे अशी परिस्थिती आहे. शिवाजी महाराज हा हँगओव्हर उतरायला महाराष्ट्राला अजून  किती दिवस लागणार आहेत कुणास ठाऊक! चौकात (आता तर समुद्रातही) पुतळे, रस्त्यांना, सार्वजनिक इमारतींना नावे, जयंत्या, पुण्यतिथ्यांचे वाद, त्यांना निघणाऱ्या 'आवाज कुणाचा....? ' मिरवणुकी आणि या सगळ्यांचे धार्जिणे राज्यकर्ते. केतकरांचे चुकलेच. कुणासाठी आपण काय लिहितो आहोत याचे भान सुटले की असेच व्हायचे. इतिहास महत्त्वाचा. वर्तमान, भविष्य याविषयी बोलू नका. इतिहासाचे काय ते बोला.