वरकरणी हल्ला केतकरांच्या घरावर झाला असे भासत असले तरी ही मला त्यात त्यांच्या कडून जी तिरकस पद्धतीने लिखाण केले गेले ह्याला विरोध झाला असे वाटते. हल्लेखोरांनी भलेही तो लेख वाचला नसेल पण तरीही कुठल्याही कृतीतून - प्रतिकृती , विकृती,  आकृती (सत्कृती) ह्या पैकी एक गोष्ट होणारच! लेख तिरकस लिहिला म्हणून त्यातून उत्पत्ती ही विकृत झाली.

पुतळा होणार हे सत्य! कारण त्याला खुद्द शासनाचीच मान्यता. मग तिरकस टिका का करायची? टिका करून वा विरोध करून प्रत्येक जण समाजाचा बाप होऊ पाहत असेल तर मार, शिक्षा हि मिळणारच. कारण, शिक्षा देणारा ही समाजाचा बाप बनण्याचा प्रयत्न करणार. 

समाजाचा मुलगा होऊन, लिखाण करीत शासनाला विनंती करणं हा एकच मार्ग आहे. कितीही झालं तरी हि समाजाने निवडून दिलेल्या शासकाचा मान राखायलाच हवा.

कुमार केतकर चुकलेच. शासक म्हणून जे सत्तेत बसले आहेत त्यांची कर्तृत्वाची व वैचारिक उंची कमी असली तरीही त्यांच्या पदाचा, त्यांच्या निर्णयांचा मान राखायलाच हवा. शहाणपणाला विनम्रतेची जोड असायलाच हवी. नाहीतर विध्वंस हा होणारच. कुमार केतकरां पेक्षा भरतकुमार राऊत शहाणा व विवेकशील माणुस. म. टा. मध्ये मराठी-मराठी चा जप केल्यामूळे त्यांना राज्यसभेचे पद भुषवित आहेत.