तो अग्रलेख हल्लेखोरांना नीट समजला नसण्याची शक्यता आहे. कारण
१) नेहरूंचा शिवाजीद्वेष कुप्रसिद्ध आहे.
२) केतकर तर रोज समस्त नेहरू घराण्याच्या पायांचे तीर्थप्राशन केल्याशिवाय लेखणीला हातही लावत नाहीत.
३) अग्रलेखाची भाषा कुचेष्टेची आहे.
त्यामुळे कदाचित हल्लेखोरांचा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे. खरे तर प्रस्तुत अग्रलेखात अनिवासी भारतीयांना वा संघवाल्यांना उद्देशून शिवराळ टिप्पण्णी, वा सोनिया, राहूल, रेहान वर स्तुतीसुमने नसल्याने तो केतकरांनी लिहिलाच नसावा असे वाटते.
लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे हल्ला शिवसेना, भाजपा, मनसे यांनी न केल्यामुळे तथाकथित पुरोगामी जेमतेम निषेधाचा सूर काढून गप्प आहेत. माध्यमेही आठ दिवस रोज चघळत नाही आहेत.
असा हल्ला होणे आणि त्यांची वाढती संख्या हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे, केतकर स्वतःच पत्रकारितेला एक कलंक आहेत असे मत असले तरी.