"असा हल्ला होणे आणि त्यांची वाढती संख्या हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे," ह्याबाबत दुमत अशक्यच आहे. कुमार केतकरांच्या निष्ठांबाबत, मतांबाबत प्रखर प्रतिकूल मते असू शकतात. पण "केतकर पत्रकारितेला कलंक आहेत," असे म्हणणे सौम्य शब्दांत म्हणायचे तर जरा जादाच वाटते.