कळफलक, विदागार, मातृफलक, विपत्र हे नवे आणि अनोळखी शब्द वापरण्यापेक्षा कीबोर्ड, डेटाबेस, मदरबोर्ड, इमेल या प्रचलित शब्दांना मराठी व्याकरणाप्रमाणे चालवावे म्हणजे ते आपोआप मराठीच वाटू लागतील. मराठीत एखादा शब्द नसताना इतरभाषिक शब्द आपल्या रोजच्या व्यवहारात वापरण्यामागे कोणताही भाषिक अहंकार, वर्चस्ववाद किंवा शुद्धाशुद्धता मानू नये. मात्र सोपा मराठी शब्द उपलब्ध असताना संस्कृत, हिंदी किंवा इंग्लिश शब्द वापरू नयेत असे वाटते.