वरदा, दुव्याबद्दल धन्यवाद. लेखात काही विशेष वाटले नाही. सहसा वर्तमानपत्रांचे अग्रलेख जसे सरकारी धोरणांवर टीका करतात तसाच लेख. त्यात हल्ला करण्यासारखे काय असावे कळले नाही. बरं, प्रसिद्धीसाठी नि बातमीसाठी हल्ला केला म्हटले तर लोकसत्ताची चांगली प्रसिद्धी होते आहे आणि राष्ट्रवादीतील मतभेद वेशीवर टांगलेले दिसत आहेत. त्यातल्या त्यात मिळणारा संदेश एव्हढाच, की तुम्ही सत्तेत असाल तर राजरोसपणे कायदा पायदळी तुडवू शकता. पण यातही काही नवीन आहे असेही नाही.

(माझा काल लिहिलेला प्रतिसाद गायब झालेला दिसतो आहे म्हणून पुन्हा.)