आपल्या मराठी भाषेतील बुद्धिमंतांनी सुरवाती पासून म्हणजे इंग्रजी चा मराठी भाशिकांशी सबंध आल्यापासून इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द म्हणून नवा शब्द सुचविताना तो इंग्रजी शब्द भांशांतरीत करण्यालाच 'मराठीकरण' मानले आहे. व तीच परंपरा अजून इतक्या वर्षांपर्यंत चालू आहे. पूण्याच्या सोवळे जपणाऱ्या शास्त्रीबुवा, पंडीतांनी पूण्याच्याच उच्चभ्रू समाजाचे शब्द व उच्चारणालाच 'शुद्धं' मानले. त्यामूळे महाराश्ट्रातील सामान्य जनता एखादा पाश्चात्य शब्द कसा उच्चारते याकडे लक्षच दिले गेले नाही. (व त्याच बरोबर त्याचा अभ्यास करायला हवा हे जाणले नाही.) इंग्रजी पूर्वी जे परशब्द मराठीत आले व रुजले ते सामान्य भाशिकांनी त्यांना जसे उच्चारता आले तसे उच्चारले. खरतरं याच पद्धतीला 'मराठीकरण' म्हणायला हवे.
इंग्रजी भाशेत परशब्द येतात तेव्हा त्याला englify म्हटले जाते. उदा. :- रेस्तुरांत जेव्हा इंग्रजीत येतो तेव्हा तो रेस्टॉरंट होतो. आपल्या उच्चाराला कमी न लेखता नवा शब्द व शब्दसंकल्पनेचा स्वीकार हा स्वाभिमान आहे असं मला वाटतं. व तो इंग्रजी भाशेत व पर्यायाने त्यांच्या भाशाविद्वानांमध्ये आहे.
वर म्हटल्याप्रमाणे सन १८०० पासून पूण्याच्या सोवळे जपणाऱ्या शास्त्रीबुवा, पंडीतांनी सामान्य जनतेचे उच्चार, त्यांचे शब्द हे अशुद्ध (व म्हणून हीन दर्जाचे) मानले. ह्या अशा मानसिकतेमूळे २५० वर्शांपासून महाराश्ट्रातील सामान्य जनतेला आपली बोली ही अशूद्ध व 'पूण्याची बोली' शुद्ध असते असेच वाटते.
ज्या पद्धतीला 'मराठीकरण' म्हटले जाते ती पद्धत म्हणजे 'भाशांतर' नसून 'सामान्य मराठी जनतेचे उच्चारण' हे समजायला अजून किती वर्शे जाणार देवच जाणे?
(माझा कुठल्याही जातीच्या लोकांवर राग नाही. ईतिहासाते जे घडलं ते घडलं! पण त्यातून सूधारणा व्हावी एवढचं माझं मत आहे.)