इंग्रजी भाषेत परशब्द येतात तेव्हा त्याला englify म्हटले जाते. उदा. :- रेस्तुरांत जेव्हा इंग्रजीत येतो तेव्हा तो रेस्टॉरंट होतो. आपल्या उच्चाराला कमी न लेखता नवा शब्द व शब्दसंकल्पनेचा स्वीकार हा स्वाभिमान आहे असं मला वाटतं. व तो इंग्रजी भाषेत व पर्यायाने त्यांच्या भाषाविद्वानांमध्ये आहे.
मी englify ह्या शब्दाचा अर्थ डिक्शनरी डॉट कॉम येथे शोधण्याचा प्रयत्न केला. तेथे मला त्याचा अर्थ दाखवण्याचे तर सोडाच उलट मलाच पन्नास एक शब्द पर्यायी म्हणून दाखवले! मीच आपले त्यातल्या त्यात (anglify) अँग्लिफाय चा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला.
तुम्हाला तोच शब्द म्हणायचे आहे का? तसे असेल तर हा तुमचा टायपिंगचा दोष आहे की तुम्हाला मुद्दाम तो तसा लिहून काही सुचवायचे आहे? की खरेतर इंग्लिशमध्ये englify असेच लिहायला हवे होते आणि ते चुकीने anglify असे रूढ झाले असावे, असे तुम्हाला वाटते?
(हे फक्त माझ्या माहितीसाठी विचारत आहे. आमचे इंग्लिशचे मास्तर सांगत. इंग्लिश नाही आले तर उपाशी मरशील. एकवेळ मराठी चुकीचे बरोबर कसेही लिहिलेस तरी काही बिघडत नाही पण इंग्लिश स्पेलिंग चुकू नकोस! तेव्हापासून इतकी धडकी भरली आहे, की नवा माहीत नसलेला इंग्लिश शब्द दिसला की तो लगेच तो समजून घेऊन तो मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो.)