'जरा जपून' एवढाच सल्ला मी दिला आहे. हा माझ्या माहितीप्रमाणे विसुनाना यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे, लहान मुलांचा यात सहभाग आहे, त्यामुळे जे कराल ते जरा जपून करा असे सांगणे हे शुभेच्छांचेच एक्सटेन्शन आहे, असे मला वाटते. समई लावताना ज्योत फडफडू नये म्हणून तीभोवती हाताची ओंजळ धरतात. आपल्या तर्कानुसार असे करणाऱ्यांना 'ज्योत मालवेल असा अपशकुनी विचार तुमच्या डोक्यात येतो तरी कसा? ' असे विचारले पाहिजे! हैदराबादेत असं काही घडलंय का हा विनोद आवडला. आपण पुढच्या वेळी तुम्ही जेंव्हा वाहन चालवाल, तेंव्हा अगदी बेदरकारपणे चालवा. कुणी विचारले तर सांगा, 'आजपर्यंत एखादा अपघात घडलाय का?'