"भाषाशुद्धीवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्दनिर्मितीचा रोग जडला आहे.त्यांच्या ह्या उद्योगामुळे अस्वाभाविक शब्दांची टाकसाळ निर्माण झाली आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. त्यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवणच पक्की१ होत आहे," प्रा. श्री. के. क्षीरसागर ह्यांचे हे मत आपण इथे लक्षात घेण्यासारखे आहे.
१. शब्दाला शब्द जोडून तयार केलेले प्रतिशब्दांची यादी बरीच मोठी आहे. लगेच आठवणारी काही दाखले :