सावरकरांच्या शुद्धीकरणामुळे अनेक इंग्रजी शब्दांना प्रतिश्ब्द मिळाले तरी
अचानक संस्कृतप्रचुर मराठीचे महत्त्व वाढले आणि खरे सांगायचे तर भाषेचा
नैसर्गिक प्रवाह खुंटल्यासारखा झाला. आज प्रतिशब्द शोधणाऱ्या लोकांवर
सावरकरांचा प्रभाव असल्याने ते काहीसे बोजड, संस्कृतप्रचुर प्रतिशब्द
सुचवतात आणि त्यामुळे टवाळी होते.
हे खरे आहे. म्हणूनच प्रा. श्री. के. क्षीरसागरांना त्या काळी सह्याद्री मासिकात "मराठीचे वैरी सावरकर आणि पटवर्धन" हा लेख लिहावासा वाटला असावा. सावरकरांनी अतिशय चांगले प्रतिशब्द मराठीला दिले, हे खरेच. आहे. पण 'प्रत्यवाय'सारखे सावरकरी शब्द काही सावरकरभक्त सोडल्यास कोणी वापरत नाही.
मनोगतावर जुन्या भाषेत कविता लिहिली तर ७० वर्षाच्या आजीबाईसारखी कविता आहे अशी हेटाळणी होते हे बरोबर नाही.
जुने शब्द असायला हरकत (प्रत्यवाय) नाही. एखादा दुसरा शब्द चालून जातो. पण तोही अगदीच जुनाट नको. (उदा.: बरवा, झणी वगैरे) कवीची आणि लेखकाची भाषा आजतागायत (ज्या काळात तो जगतो त्या काळातली भाषा) असायला हवी, असे मला वाटते. जुन्या (आर्केइक किंवा पुराण्या) भाषेत कविता सुचणे (विनोदनिर्मितीचे कुठलेही प्रयोजन नसताना) हा दोष नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?