सामना, तरूण भारत, काँग्रेस संदेश, साधना यासारख्या पक्ष वा संघटनांच्या मुखपत्रांमध्ये लिहिणाऱ्यांना एका मर्यादित अर्थानेच पत्रकार म्हणता येईल असे वाटते.

पण निःष्पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या वृत्तपत्र व पत्रकारांकडून काही अपेक्षा असतात व त्यांच्या काही जबाबदाऱ्याही असतात असे वाटते. प्रत्येक पत्रकाराची स्वतःची काही मते असणार व तो पुर्वग्रह त्याच्या लेखनातून दिसून येणार हेही खरे.  शिवाय पत्राच्या मालकीप्रमाणे संपादकीय धोरणही बदलणार वा त्याचाही प्रभाव दिसणार हेही आलेच. याची वर तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे इतरही अनेक उदाहरणे देता येतील हेही खरेच आहे. केतकरांच्याही लेखनातून तो पूर्वीही दिसून आला आहे, पण गेल्या सात आठ वर्षात त्यांनी एकांगी आणि पक्षपाती पत्रकारितेचा नीचांक गाठला आहे असे वाटते, अनेक केतकरप्रेमीही ही गोष्ट खेदाने मान्य करतात. गडकरी हे पवारप्रेमी होते तरी एवढे एकांगी नव्हते, टिकेकर मात्र बरेच संतुलित होते आणि त्या काळातली लोकसत्ताची पत केतकरांनी आता धुळीस मिळवली असे वाटते. गेल्या काही वर्षातले त्यांचे अग्रलेख वा विशेष लेख हे लाळघोटेपणा याच सदरात मोडतात, हे तुम्हीही मान्य कराल असे वाटते. त्यांच्यावर आता प्रामाणिक पत्रकारितेचा आरोप कुणी करू धजेल असे वाटत नाही.

त्यांचा अभ्यास, व्यासंग हे मान्य करूनही वर उल्लेख केलेल्या कामगिरीमुळे मी कलंक हा शब्द वापरला आहे. पण ते एकटेच कलंक आहेत असा म्हणण्याचा आशय नाही, किंबहुना सध्या या व्यवसायाच्याही झालेल्या बाजारीकरणामुळे पत्रकारधर्माला जागणारे कोण आहेत हाच संशोधनाचा विषय होईल.