दिवसंग हा शब्द कसा वाटेल? दिवस आणि संगत हे दोन्ही त्यात प्रतिबिंबित होतील असे वाटते.  हा किंवा इतर प्रतिशब्द वापरून दिनांकना/दिवसंगाच्या संकल्पने/समस्ये/संस्कृतीवर कोणी सातत्याने लेखन करत गेले तर तो तो शब्द रुळेल.

डेट ह्या शब्दासाठी रॉंडेवू, ट्रिस्ट ("ट्रिस्ट विद डेस्टिनी" च्या ऐवजी नेहरी "डेट विद डेस्टिनी वापरणार होते असे कुठेतरी वाटल्याचे आठवते. चुभूद्याघ्या.) हा शब्ददेखील  आहे. डेटिंग ह्या शब्दाच्या दिवसंग प्रतिशब्दात दिवस शब्दाला शब्द जोडल्याप्रमाणे आला आहे. आल्यास हरकत नाही. पण दिवसंग हा शब्द वाचून लगेच अर्थबोधही होत नाही. 'प्रेमभेट', 'स्नेहभेट' ह्या शब्दांसारखे शब्दही चालून जातील.




१.'डेट', 'ट्रिस्ट', 'राँडेवू' ह्या सर्व शब्दांसाठी 'अभिसार' हा शब्द रूढ आहे असे वाटते. चूभूद्याघ्या. पण डेटिंग करणाऱ्यांना अभिसार हा शब्द वापरताना लाज वाटू शकते. आपण कुठलेतरी उदात्त, उन्नत कार्य करतो आहोत किंवा  करायला जातो आहोत, असे त्यांना वाटायची दाट शक्यता आहे.