नैसर्गिक निवडीचा अर्थ निसर्गाने केलेली निवड असा नसून स्वाभाविक निवड वा आपोआप झालेली निवड असा असावा. भोवतालामध्ये दीर्घकालीन बदल झल्यावर की एखाद्या जातीच्या प्राण्यांपैकी काही टिकले काही टिकू शकले नाहीत. जे टिकू शकले त्यांत असे काहीतरी होते की ज्यामुळे ते टिकू शकले. ते टिकल्यामुळे त्यांची संतती पुढे वाढून ते 'काहीतरी' पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि ते प्राणी उत्क्रांत झाले. त्यामुळे प्राण्यांमधील बदलांचे नियंत्रण हे परिस्थितीतील बदलांकडे असते असे म्हणता यावे.