विश्वातील मी आणि माझ्यातील विश्व वगैरे माझ्यामते शाब्दिक खेळ झाले. माझ्यातले विश्व म्हणजे नेमके काय? माझ्याभोवती जे आहे त्यालाच विश्व असे नाव मिळाले. माझ्याभोवतीचे विश्व माझे घर, पृथ्वी, आकाशगंगा आणि त्याही पलिकडे मोठे आहे. किती मोठे ह्याची कल्पना नाही. तसेच माणसाच्या स्वभावाचा पूर्ण कल्पना करता येत नाही म्हणून माणसातले विश्व वगैरे हे शब्दप्रयोग झाले, माणसाच्या मनाला दिलेली विश्वाची उपमा झाली. हा केवळशब्दांचा वापर झाला. एक भौतिक आहे, दुसरे मानसिक आहे. त्यामुळे खरे तर त्यात गल्लत होण्याचे कारणच नाही.