मंदार मोडक,

सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार! तुमचाही अनुभव छान आहे. सांजधारा हा कार्यक्रम मी कधीच ऐकला नाही. रेडिओवरून टेपवर आवडती गाणी साठवून घेताना काहीवेळा ते नीट घेता आले नाही तर खूप चिडचिड व्हायची. एकदा कुणीतरी टेपचा आवाज बंद करून ठेवला होता, एकदा टेप संपली होती आणि एकदा घाई गडबडीत पलंगावरून उठले गाणे  टेप करायला तर पायच मुरगळला. अश्या आठवणी आहेत. मी  माझ्या आवडत्या गाण्यांच्या २ कॅसेट तयार केल्या होत्या. त्यातली एक  अजूनही माझ्याकडे आहे आणि एक हरवली   तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यावेळची मजा काही औरच होती. खरे आहे. रेडिओवरचे पुढचे गाणे कोणते लागणार हे माहित नसल्यामुळेच जास्त रेडिओ ऐकला जातो. आणि मुख्य म्हणजे गाणी ऐकता ऐकता बाकीची कामे पण होतात. शिवाय गाण्याच्या अधूनमधून जे निवेदन करतात ना ते पण छान असते त्यामुळे गाण्याची एक वातावरणनिर्मिती होते. सध्या मी ऑनलाईन रेडिओचा आनंद घेत आहे. दुवा क्र. १ या स्थळावर आमच्या दुपारी २ ते ४ जुनी हिंदी गाणी लागतात. दोन गाण्यांच्या मध्ये जी निवेदन करते तिचा आवाज पण एकदम छान आहे.

रोहिणी