*भाषा सल्लागार मंडळाने वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेच्या निर्मितीसाठी आधारभूत म्हणून ठरवून दिलेली निदेशक तत्त्वे
**[संदर्भ : भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (मराठी-इंग्रजी);भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन.मुंबई -फेब्रुवारी,२००६.]
==शब्दसंग्रह व पर्याय==
हिंदी वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेची निर्मिती करताना केंद्र सरकारने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात यापूर्वी झालेल्या कार्याचा आढावा घेतला होता आणि निरनिराळ्या राज्यात याबाबत एकूण कार्यात समन्वय साधण्याचे प्रयत्‍नही केले होते.  मराठी तांत्रिक परिभाषेची निर्मिती करतानादेखील त्याच धोरणाचा अवलंब करून प्रत्येक विद्याशाखेतील शब्दाचे संकलन केले गेले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेली विज्ञान शब्दावली आधारभूत मानावी व पुणे विद्यापीठ,माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्यातील  विज्ञान संस्थांच्या शब्दावल्यांचाही विचार करावा असे धोरण ठेवण्यात आले होते. त्याचवेळी माध्यमिक स्तरावरील वैज्ञानिक व तांत्रिक विषयांच्या पाठ्य पुस्तकातून पुष्कळशा तांत्रिक शब्दांचे जे पर्याय रूढ झाले आहेत तेदेखील विचारात घ्यावेत आणि मगच शब्दावलीला अंतिम रूप द्यावे.

==आंतरराष्ट्रीय संज्ञा==
'आंतरराष्टीय संज्ञा' या शक्यतोवर त्यांच्या इंग्रजी स्वरूपातच ठेवाव्यावत व त्यांचे मराठी भाषेत लिप्यंतरण करावे.
आंतरराष्ट्रीय संज्ञात पुढील गोष्टींचा समावेश होतो:-
===मूलद्रव्ये आणि संयुगे (महत्त्वाची पदे, उपपदे, वगैरंसह)यांची नावे===
ही नावे लिप्यंतर करून देताना नावांपुढे त्यांची संकेतचिन्हेसुद्धा द्यावीत. जसे- हायड्रोजन(H),कार्बन(C),कार्बन डाय ऑक्साइड (CO<sub>2).

म्हणजे  मूलद्रव्ये आणि संयुगे यांसाठी वापरण्यात येणारी संकेत चिन्हे व संक्षेप रोमन लिपीत जसेच्यातसे ठेवावे.उदा:Cu (तांबे), <math>90^{Th^{128}}(किरणोत्सारी थोरिअमचा समस्थानिक), C10H14N2( निकोटीन);NaOH ( सोडिअम हायड्रॉक्साइड).

====इंग्रजीतील संकेतचिन्हे ====
शास्त्रीय समीकरणे,सूत्रे तसेच रासायनिक चिन्हांकित समीकरणे यामधील इंग्रजीतील संकेतचिन्हे जशीच्यातशी ठेवावीत जसे:-

(1) शास्त्रीय समीकरण-
:<math>E = m.c^2 (वस्तुमान-ऊर्जा यांचा संबध दर्शवणारे समीकरण)

:<math>\frac{1}{f}=\frac{1}{v}-\frac{1}{u} (प्रतिमेचे व पदार्थाचे अंतर आणि नाभीय अंतर यांमधील संबध दर्शवणारे सूत्र)

(2) रासायनिक चिन्हांकित समीकरणे -

{| class="wikitable"
|-
|NaHSO<sub>4||+||NaCl||=||Na2||+||HCl
|-
|{सोडिअम बाय सल्फेट} ||+||{सोडिअम क्लोराइड}||=||{सोडिअम सल्फेट}||+||{हायड्रोक्लोरिक आम्ल}

|}


 
(3) गंधक(sulphur),चांदी(silver),तांबे(copper),कथील(Tin),पारा(mercury),जस्त(zinc),शिसे(--), इत्यादी रूढ शब्द वर्णनात तसेच राहावेत परंतु संयुगाची नावे देताना ती त्यांच्या प्रचलित इंग्रजी अथवा ग्रीक नावांप्रमाणे द्यावीत जसे :- सिल्व्हर क्लोराइड, क्यूप्रस ऑक्साइड वगैरे.

===वजने ,मापे आणि परिमाणे===
जसे-कॅलरी(calorie),ऍम्पियर(ampere),डाइन(dyne) वगैरे.

===विशेषनामे व त्या नामांवरून घेतलेल्या संज्ञा===
मूळ भाषेतील त्यांच्या उच्चारानुरूप लिहाव्यात जसे -फॅरनहाईट श्रेणी(फॅरनहाईट),व्होल्टमीटर(व्होल्ट),ऍम्पिअर(ऍम्पिअर).

===द्विपद नामसंज्ञा ===
वनस्पतिशास्त्र,प्राणिशास्त्र,भूशास्त्र शास्त्रीय विषयातील द्विपद नामसंज्ञा (binomial nomenclature)
===स्थिरांक===
जसे <math>\pi, G (*गणितीय स्थिरांक 'जी'चा फाँट बदलणे शिल्लक आहे.) वगैरे.

===नवीन शब्द===
रेडिओ,पेट्रोल,रडार,इलेक्ट्रॉन,न्युट्रॉन,प्रोटॉन या सारखे नवीन शब्द.
===संख्यांक,संकेतचिन्हे,सूत्रे ===
गणित व इतर भाषांमध्ये वापरण्यात येणारे संख्यांक,संकेतचिन्हे,सूत्रे जसे -साइन(sin),कोसाइन(cos) टॅंजंट(tan),लॉग(log)वगैरे.

परंतु,गणितीय क्रिया आणि त्रिकोणमितीतील गुणोत्तरे यांमध्ये रोमन किंवा ग्रीक वर्णमालेतील अक्षरेच वापरली पाहिजेत. जसे:-sin<sup>2θ+cos2θ=1 वगैरे.


तथापि, वर निर्दिष्ट केलेल्या संज्ञांपैकी पुष्कळशा संज्ञांना मराठीत योग्य पर्याय असून ते शाळा महाविद्यालये इत्यादीत कित्येक वर्षा पासून रूढ झाले आहेत. जसे - ऑक्सिजन-प्राणवायू,कॅलरी-उष्मांक; sin-ज्या,cos-कोज्या वगैरे, '''तेव्हा आंतरराष्ट्रीय संज्ञा लिप्यांतर करून देताना त्या बरोअबर मराठीतील रूढ पर्याय पण द्यावेत.'''

==संकेतचिन्हे ==
जी संकेतचिन्हे असतील ती त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपातच (रोमन/ग्रीक लिपी-अक्षरे)

राहू द्यावीत.तथापि,संज्ञांचे संक्षेप देव नागरी लिपीतून दर्शवावेत उदा.'c.m.,सेंटी मीटर' संज्ञेचा संक्षेप देवनागरी लिपीत 'से.मी.' असा द्यावा.
 
मात्र,शास्त्रीय व तांत्रिक विषयांच्या प्रगत पाठ्यपुस्तकात किंवा प्रमाण ग्रंथात आंतरराष्ट्रीय संकेत चिन्हे  वा संक्षेप (जसे-'c.m.')यांचाच वापर करावा.

==भूमितीय आकृत्या साठी ==
कोन,त्रिकोण,चौकोन, यांसारख्या या सारख्या भूमितीय आकृत्या साठी 'अ ','ब ','क ','ड' सारखी मराठी अक्षरे घेता येतील .परंतु त्रिकोणमितीतील अन्योन्य संबंध दाखवताना केवळ रोमन आणि ग्रीक वर्णमालेतील अक्षरे वापरावीत

==वैज्ञानिक व तांत्रिक पारिभाषिक  पर्यायांची निश्चिती ==
वैज्ञानिक व तांत्रिक पारिभाषिक शब्दांसाठी  पर्यायांची निश्चिती करताना अर्थाची निश्चितता  व सुबोधता यावर अधिक भर द्यावा. शक्यतोवर अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये वापरता येतील असेच पर्याय निवडावेत; परंतु, निवडलेले पर्याय हे मराठी भाषेच्या प्रकृतीशी विरोधी असू नयेत.अडचणीच्या व अपवादात्मक परिस्थितीत संस्कृत भाषेतील क्रियापदे,उपसर्ग,वगैरेंचा आधार घ्यावा .मात्र भाषेच्या शुद्धीकरणाचे धोरण ठेवू नये.
==प्रचलित देशीय पर्याय== 
विवक्षित वैज्ञानिक शब्दांसाठी जे देशीय पर्याय मराठी भाषेत प्रचलित आहेत ते आणि सर्व साधारण वापरण्यात येणारे पर्याय तसेच राहू द्यावेअत. जसे- तार(telegram),बिनतारीयंत्र(telegraph),खंड(continent),अणु(atom) वगैरे.

==प्रचलित विदेशी शब्द==
विदेशी भाषांतील जे शब्द मराठी भाषेत प्रचलित आहेत ते तसेच ठेवावेत.जसे-मशीन,इंजिन,मीटर,लिटर,लाव्हा वगैरे.

==लिप्यांतरण==
आंतरराष्ट्रीय संज्ञांचे मराठीत लिप्यांतरण: आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इंग्रजी संज्ञा जशाच्या तशा स्वीकारताना , त्यांचे प्रमाण इंग्रजी उच्चारणनुरूप लिप्यांतरण करावे.
==लिंगनिर्देश==
लिंगनिर्देश : मराठी भाषेत स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय  संज्ञांचा लिंगनिर्देश हा , मराठी भाषेच्या प्रकृतीशी विसंगत होणार नाही असा असावा.सर्व साधारण पणे अशा संज्ञांचा निर्देश पुल्लिंगात असावा.
==संधी , समास व  आदीवृद्धी == 
शास्त्रीय संज्ञांच्या पर्यायांच्या बाबतीत संधी व समास  दोन किंवा अधिक पर्यायांचा संधी किंवा समास करताना ,गुंतागुंतीचे क्लिष्ट प्रकार टाळण्यात यावेत.नव्याने बनवण्यात आलेल्या शब्दांमध्ये आदीवृद्धी टाळावी.
==अनुनासिक==
अनुस्वार: अनुनासिक वर्णाच्या जागी अनुस्वाराचा उपयोग करता येईल .परंतु,antenna,tangent सारख्या शब्दात तो शक्यतो वापरू नये.
असे शब्द ऍंटेना च्या ऐवजी 'ऍन्टेना'; 'टॅन्जंट' असे लिप्यांतरीत करावे.

==मिश्र शब्दांची निर्मिती ==
मिश्र शब्दांची निर्मिती -वैज्ञानिक परिभाषा तयार करताना 'pasturisation'- पाश्चरीकरण ,'voltage'- व्होल्टता,'ionisation' आयनन
अशासारखे मिश्र शब्द बनवणे भाषेच्या स्वाभाविक प्रकृतीस अनुसरून असल्यामुळे गरजेनुसार असे शब्द तयार करावेत.

==समानार्थी==
जरूर तेथे समानाअर्थी पारिभाषिक शब्दांची कुळे लक्षात घेऊन त्यांसाठी
पारिभाषिक शब्द निश्चित करावेत.
 
[[Category:मराठी व्याकरण]] [[Category:विकिकरण]] [[वर्ग:शुद्धलेखन]]