इथे सर्वच सदस्य आपापले साहित्य प्रकाशित करण्यास मुक्त असून त्या साहित्याला इतर कुणी संपादित करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे दिवाळी अंकासाठी तरी ते का असावं? हे मनोगताच्या आणि एकूणच जालावर आपलं साहित्य प्रकाशित करण्याच्या तत्त्वाला धरून नाही. त्यामुळे पडद्या आडून दिवाळी अंकाचं तथाकथित संपादन करण्याची काही गरज नसावी.
उलट सदस्यांनीच एकत्र येऊन खास दिवाळीनिमित्त साहित्य लिहून ते एका विवक्षित दिवशी सामुदायिकरित्या प्रकाशित करावे.
हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी एकत्र येऊन इतर सहमनोगतींचे साहित्य स्वीकारणे किंवा नाकारणे योग्य ठरू शकेल इतका गुणात्मक फरक किंवा तफावत मनोगतींमध्ये आहे असे वाटत नाही. त्यामुळे दिवाळी अंकाचा मागील वर्षाप्रमाणेच नवा प्रयोग करण्याला माझा विरोध आहे.
अजून एक म्हणजे, मागच्या वर्षी दिवाळी अंकासाठी संपादक म्हणून काम करणाऱ्या कोणीच या वर्षी प्रत्यक्ष किंवा पडद्या आडून संपादक म्हणून काम करू नये.
दिवाळी अंकामुळे या संकेतस्थळावरचा परस्परसौहार्द वाढणार असेल तरच या भानगडीत पडावे अन्यथा तो विचार सोडून द्यावा असे वाईटपणा पत्करूनही सांगावेसे वाटते,
--अदिती