दिवाळी अंकाचा हेतू एका किमान दर्जाचे लिखाण एकाच दिवशी एका ठिकाणी - दिवाळीच्या निमित्ताने - प्रसिद्ध व्हावे असा आहे. यात संपादक मंडळाची भूमिका ही हे साहित्य एकत्र करणे, त्याची लोकशाही पद्धतीने छाननी करणे, त्याला तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बनवणे आणि शक्य तितक्या आकर्षक स्वरुपात ते प्रसिद्ध करणे इतकीच आहे. (आणि हेही खूप मोठे काम आहे) जालावर लिहिलेले सगळेच साहित्य काही दर्जेदार असत नाही - ते तसे असणेही शक्य नाही. एकंदरीत लिखाणाचा रेटा बघता जमलेले सगळे साहित्य जसेच्या तसे प्रसिद्ध करणेही तांत्रिकदृष्ट्याही शक्य नाही. त्यामुळे ही चाळणी लावणे आवश्यक आहे. आणि समजा, एखाद्याने लिहिलेले काही दिवाळी अंकात नाही प्रसिद्ध होऊ शकले, म्हणून लगेच त्याचा अर्थ त्या लेखक / लेखिकेत काहीतरी हीण आहे असा होत नाही. ('सत्यकथे' ने प्रसिद्ध केलेल्या साहित्यापेक्षा नाकारलेलेच साहित्य अधिक होते! )
हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी
प्रत्यक्ष किंवा पडद्या आडून
संकेतस्थळावरचा परस्परसौहार्द वाढणार असेल तरच या भानगडीत पडावे
या वाक्प्रयोगांनी विरोध दिवाळी अंकाला आहे, की अंकसमितीला असा मला प्रश्न पडला आहे. म्हणून तर या वर्षी नव्या सदस्यांसाठी सहभागाचे आवाहन केले आहे. या वर्षी ही संपूर्ण जबाबदारी नव्या रक्ताने घेतली तर गेल्या वर्षीच्या अंकसमितीचा एक सदस्य म्हणून मला तरी आनंदच होईल.
शेवटी संकेतस्थळावरचा परस्परसौहार्द याविषयी न राहवून थोडेसे. तुम्ही 'सेंड' ही कळ दाबली नाही तर तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील असे कालच वाचले. मॉनिटरची दोन चित्रे असलेल्या ठिकाणी माऊसचे उजवे बटण दाबून 'डिस्कनेक्ट' केले की झाले. आंतरजालावरील परस्परसंबंध संपूर्ण मृगजळी असतात, आणि ते तसेच असावेत.
दिवाळी अंकाच्या 'भानगडी' त न पडल्यामुळे पस्परसंबंध अधिक चांगले कसे होतील, हेही समजले नाही.
आणि अगदी शेवटी ह. घ्या. : 'मौनसंमती' यावर तुमचे काय मत आहे?