प्रस्तावित दिवाळी अंकाविषयी वरील प्रतिसादांत मांडलेली भिन्न-भिन्न व परस्परविरोधी मते पाहता मनोगतच्या अधिकाधिक सदस्यांचा कौल घेण्याची कल्पना माझ्या डोक्यात (?) आली. पुष्कळ सदस्यांना एखाद्या विषायावर काही विशिष्ट मत असते परंतु मोजकेच सदस्य प्रतिसाद देऊन आपले 'मनोगत' कळवतात. यात काही भाग आळसाचा असतो हे खरे असले तरी नावानिशी मत नोंदवून वाईटपणा का घ्या ह्या भूमिकेचाही त्यात अंतर्भाग असावा असे वाटते.
         यावर तोडगा म्हणून मी एक ऑन-लाईन पोल सुरू केलेला आहे. इथे जाऊन सदस्यांनी २३ जूनपर्यंत पोलमध्ये सहभागी व्हावे ही विनंती. हा सर्वस्वी माझा वैयक्तिक उपक्रम आहे, दिवाळी मनोगतच्या संपादक मंडळाचा अथवा प्रशासनाचा याच्याशी काही संबंध नाही. तसेच ही उठाठेव केवळ मनोगतींचा कल जाणून घेण्याकरता आहे. याचा निकाल कोणावरही - प्रशासकांवर, सदस्यांवर, संपादक मंडळावर - बंधनकारक नाही.

ता. क. सदस्यांनी एकदाच मत नोंदवावे ही नम्र विनंती.