ज्या मंडळींनी दिवाळी अंकाच्या कल्पनेस पूर्वानुभवाने अथवा त्याशिवायही विरोध दर्शवला आहे त्यांच्या मुद्यात निश्चितच तथ्य आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेहमी प्रशासक सोडता सर्व मनोगती एकाच पातळीवर असताना या दिवाळी अंकापुरते का होईना काही मनोगतींनी परीक्षकाची भूमिका बजावणे म्हणजे ते इतरांपेक्षा कोणी तरी वेगळे आणि थोडे अधिक कळणारे आहेत ( असे त्यांना वाटत नसले तरी) असा मतितार्थ निघतो आणि ही कल्पना व भूमिका मला फारशी योग्य वाटत नाही‍, जे साहित्य दिवाळी अंकात प्रकाशित होणार असते ते मनोगतवर दिवाळी अंक प्रकाशित झाला नाही तर मनोगतींना वाचायला मिळणार नाही अशातलाही भाग नाही  ते पुढेमागे मनोगती प्रकाशित करणारच, त्यामुळे दिवाळी अंक काढण्याचे कष्ट आणि मेहनत करून काही लोकांनी काही मनोगतींची नाराजी निष्कारण ओढवून घेऊ नये असे वाटते.