मनोजय,
मूळ लेखकाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. पण त्या सर्वांचा समाधानकारक रितीने लेखी उहापोह येथे करता येणे निव्वळ अशक्य आहे. कारण काही मूलभूत संकल्पना इतक्या करप्ट झाल्या आहेत की त्यावरच लिहिण्यातच खूप वेळ आणि शक्ती खर्च होईल. प्रत्यक्ष चर्चा हाच त्यावर उपाय होऊ शकतो.
तरी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर चांगले होईल.
नासदीय सूक्तामध्ये विश्वाच्या निर्मिती बद्दल लिहिले आहे. त्यात तर देवही नंतर तयार झाले असे लिहिले आहे. यावरून विश्वाची निर्मिती करणारा तो देव अशी देवाची संकल्पना येथे अभिप्रेत नाही हे स्पष्ट होते.
भारत एक खोज नावाची एक मालिका दूरदर्शनवर लागत असे. त्याच्या शीर्षकगीतात नासदीय सूक्ताचे हिंदी भाषांतर होते. सृष्टीका कौन है कर्ता. है किसी को नही पता नही है पता.. ऽ असे काहीसे ते गीत होते.