लाख मोलाचं बोललात, महेश. या विषयावर अभिनिवेशरहित, संयत मत क्वचितच वाचायला मिळते. बहुतेक वेळी दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका घेतलेली असते. बऱ्याचदा अशा प्रकारच्या भाषाविषयक चर्चेवर प्रतिसाददात्यांच्या राजकीय/सामाजिक/धार्मिक/निधर्मी विचारसरणीचा विलक्षण पगडा दिसून येतो. अशा वेळी असा विचारपूर्वक मांडलेला व कोणताही पूर्वग्रह नसलेला, असंबद्ध गोष्टी मध्ये न घुसडलेला अभिप्राय वाचून आनंद झाला.