एखाद्या/दीने सुचवलेला शब्द कसा चांगला/वाईट आहे हे ठरवण्यात वेळ/श्रम
घालवण्याऐवजी आपण आपल्याला चांगले वाटणारे शब्द/प्रतिशब्द वापरून त्या
त्या विषयावर अधिकाधिक लेखन करीत जावे. अधिकाधिक वापराने शब्द रुळतातच.
प्रिय महेशराव, ह्याविषयाबाबतची तुमची कळकळ, प्रयत्न आणि आस्था निर्विवाद आहे. पण बोजड शब्दांना टाळायलाच हवे, असे वाटते. टिचकी द्या, दुवा ह्या सारखे शब्द आता रुळले आहेत. भर सहज आणि स्वाभाविक शब्द रुळवण्यावर असावा. लोकव्यवहारातील शब्दांतून परिभाषा निर्माण व्हायला हवी. संस्कृत मुळीच कळत नाही त्यांना विरोपपत्र, विदागार, ऊर्ध्वश्रेणीकरण, विपत्र हे शब्द स्वीकारार्ह असतील काय? माझ्यामते नाही.
आपण लेखन करीत असताना प्रतिशब्द नसेल / आपल्याला प्रतिशब्द सुचत नसेल आणि
कोणी प्रतिशब्द सुचवले तर 'त्यातल्या त्यात' त्यावेळी चांगले वाटणारे /
मराठीत एकाहून अधिक प्रकारे सहज वापरता येतील असे प्रतिशब्द वापरावे. न
आवडलेल्या शब्दांना नाकारण्याऐवजी अधिक चांगला शब्द सुचेपर्यंत उपलब्ध
असलेला प्रतिशब्द वापरणे. (म्हणजे 'सर्वोत्तम / सर्वसामर्थ्यशाली शब्द
मिळेपर्यंत प्रतिशब्द वापरणारच नाही' ह्याऐवजी 'जिथे जिथे किंचितही शक्य
असेल तेथे तेथे प्रतिशब्द वापरीन आणि अधिक चांगल्या शब्दांचा शोध घेत
राहीन', असा विचार करावा.)
'क्लिक', 'वेबसाइट', 'मेनू', 'स्क्रोल', 'इंटरनेट' ह्यासारख्या शब्दांना प्रतिशब्दांची गरज आहे, असे अनेकांना वाटत नाही. हे शब्द आता मराठीत रुळले आहेत असे त्यांचे मत. मध्यंतरी मराठीशी भाषेच्या अभ्यासाशी संबंधित एका संकेतस्थळाची बांधणी करीत असताना 'क्लिक' ऐवजी मला आवडणारा 'टिचकी' हा शब्द वापरलेला काही तज्ज्ञांना खटकला होता. गोंधळ वाढून नये म्हणून बहुधा "नवीन शब्दप्रयोग रूढ होत नसतील
त्या शब्दांचे मूळ इंग्रजी रूपच चालू ठेवणे इष्ट आहे,"असे त्यांचे मत होते. शेवटी 'टिचकी'ची उचलबांगडी करावी लागली.
वापरून-वापरून 'टिचकी' हा शब्द रुळला आहे असे आपल्याला वाटते. पण अनेकांना 'टिचकी' आणि 'दुवा' हे शब्द वापरात आहेत हे माहीतच नाही. हे शब्द सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजेत.
अवांतर :
'प्रतिशब्द' हा योग्य शब्द आहे की 'पारिभाषिक शब्द' ?