मृग...पावसाचे पहिले नक्षत्र. खरे तर या नक्षत्रापुरताच मला पावसाळा आवडतो आणि थोडाफार आपला बालकवींच्या श्रावणमासापुरता....क्षणात येई सरसर शिरवे, क्षणात फिरुनी  ऊन्ह पडे....! बस. पावसाची माझी आवड ती एवढीच. तो रिपरिप्या पाऊस मला अगदी नकोसा वाटतो...पण मृगातला पाऊस काही वेगळाच. मृगाचा पाऊस या शीर्षकाचा एक धडा होता मराठीच्या पुस्तकात...(रा. रं. बोराडे यांचा)...
मृग नक्षत्र लागलेले आहे...शेतकऱ्याची बायको तिकडे रानात ...बाळापासून दूर. बाळ असते घरात. चंद्रमौळी झोपडीत. चंद्रमौळी असल्याने घर साहजिकच गळणारे...त्या आईची तगमग....पावसाने जोर धरण्याआधाची घरी पोहोचायला हवे...लहान बाळापाशी असायला हवे...असा तो धडा. या धड्यासाठीचे चित्रही खूपच छान होते...डोक्यावर हारा (मोठी टोपली) घेतलेली बाळाची आई लगबगीने घराकडे निघाली आहे...झाकोळून आले आहे...( सरींनाही सुरवात झाली असावी का  ? )

या छोटेखानी लेखामुळे त्या धड्याची आठवण अशी सरीसारखी बरसून गेली मनातल्या मनात !
.................
मंदार,
शं. बा. दीक्षित यांचा खगोलशास्त्रावरील ग्रंथराज तू वाचला असशीलच... खगोलप्रेमींसाठी हा ग्रंथ म्हणजे जणू गीता, कुराण बायबलच !!! {(ज्याला जे हवे, ते घ्या :) }