या पावसाळ्यात आता जरा आडवाटेचे चिंब भिजता येईल असे धबधबे, डुंबता येतील
असे डोह, हिरव्या गवताचे मखमली गालिचे, रानफुलांचा बहर, वादळी पावसात
थंडीने कुडकुडत असतांना एखाद्या झोपडीत मिळणारा गरम गरम वरण भात, तर बाहेर
धो धो पाउस कोसळत असतांना चार हजार फुटांवर गुहेच्या उबदार आसर्याला बसून
स्वतःच केलेले सूप, मॅगी, खिचडी, रस्सा असे काहीतरी चाखत निवांत आसमंत
न्याहाळत राहणे असे बरेच काही करायचे आहे, त्याची सुरूवात तर झकास झाली
आहे....
वाव्वाव्वा!!! एखादा साधा ट्रेक आयोजित करा. तुम्ही बोलावले तर मी नक्की येईन.