ज्या मालिकेचं शीर्षक गीतच इल्लोजिकल आहे. ती मालिका बघवते तरी कशी?
आता जरा कलेच्या दृष्टीनं..................
१)आता "मनाचा दगड" घेतो कण्हतं.....(गेले द्यायचे राहूनी.) दगड धातूंचा असतो मनाचा नाही.
२)जळात पाय सोडून.... अवदूंबर (बालकवी) पाय प्राण्यांना असतात झाडाला नाही.
असे लिहिणेही चुकीचे आहे?
कलाकाराच्या कल्पनेला सत्यसृष्टीची मर्यादा क घालावी?
पाऊस कुणीचा प्रियकर होऊ शकतो,
मग फुलांचे थवे का नाही होऊ शकत?
छान कल्पना आहे की, फुलं, तीही उडणारी. :)