मानवाचीच प्रगती का झाली हा अवघड प्रश्न आहे. पण काही क्लू मिळतात. शरीराचे वजन आणि मेंदूचे वजन यांचा सर्व प्राण्यांसाठी आलेख काढल्यास सरळ रेषा मिळते. यात माणसाच्या वर फक्त व्हेल मासा आहे. (चूभूद्याघ्या) माणूस द्विपाद झाला, त्याचे हात मोकळे झाले तेव्हापासून त्याच्या मेंदूत विलक्षण वाढ झाली. यात आधी काय झाले याबद्दल दुमत आहे. पण आपल्या हातांमध्ये मेंदूची सर्वात जास्त कनेक्शन्स (प्रतिशब्द आत्ता आठवत नाहिये) असतात. भाषा तेव्हाच आली असावी असाही अंदाज आहे.
विषय फार, फार मोठा आणि विस्तृत आहे. पण काही कोटी वर्षे थांबल्यास व्हेल किंवा इतर प्रगत प्राणीही बघायला मिळाले तर आश्चर्य वाटू नये. (तोपर्यंत माणसाने बहुधा स्वतःला नष्ट केले असेलच. फक्त पृथ्वी नष्ट केलेली नसावी ही आशा आहे. )
हॅम्लेट