वरदाने योग्य ते उत्तर दिले आहेच. 'नैसर्गिक निवड' ह्या शब्दयोजनेमागचे कारण सांगण्यासाठी हा प्रतिसाद.
पाळीव प्राण्यांच्या, बीबियांणाच्या अनेक संकरित जाती माणसाने तयार केल्या आहेत. याचा सोपा मार्ग म्हणजे आपल्याला हवा तो गुणधर्म थोडाफार असलेल्या पिकाच्या बिया वापरून किंवा हव्या त्या गुणधर्माच्या प्राण्यांचे अनेकानेक पिढ्या पुनरुत्पादन करणे. म्हणजे केसाळ कुत्री हवी असल्यास, उपलब्ध कुत्र्यांमधून त्यातल्या त्यात केसाळ निवडून त्यांना पिले घालू द्यायची; त्या पिल्लांमधून पुन्हा त्यातल्या त्यात केसाळ निवडून त्यांना पिले घालू द्यायची असे करत जायचे. माणसाने हजारो वर्षे असे करून अन्नधान्याच्या, गाईगुरांच्या, घोड्यांच्या, कुत्र्यांच्या अश्या अनेक जाती तयार केल्या आहेत. डार्विन महर्षींना नैसर्गिक व मानवीय निवड यात तत्त्वतः कसे साम्य आहे हे दिसले. व म्हणून आपोआप होणारी, म्हणजे सगळ्यात आरोग्यपूर्ण प्राण्याला, बीला पुनरुत्पादन करू देणारी प्रक्रिया ती नैसर्गिक असे नाव ठेवले.