आतापर्यांत विकासाचा फक्त एकाच दृष्टिकोनातून विचार झाला आहे असे वाटते.

माणसाचा मेंदू आणि त्याचे शरीर.

आणि ह्या विकासाला वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच समजून घेता येईल.

पण दोन पायांनी चालू लागल्यावर पशूचा माणूस झाला का?

विचार करण्याची क्षमता, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न.

इथून अध्यात्माचा प्रवास चालू झाला आणि माणसची एका वेगळ्या वाटेवरची प्रगती.

माणसाने जेंव्हा विज्ञानाची कास धरली (विश्वाला समजून घेतले), तेंव्हा उडाली विमाने, उभारल्या इमारती.

आणि जेंव्हा अध्यात्माचा मार्ग धरला (स्वतःला समजून घेतले) तेंव्हा निर्माण झाले साहित्य, छेडले गेले सूर.

       माणसाला प्रगतीसाठी दोघांची आवश्यकता आहे, कधी सजीव म्हणून तर कधी माणूस म्हणून.

    कोणी विकासाचा अर्थ मर्यादित करू नये, हीच अपेक्षा.