मनोगती लेखक/कवींना हे आवाहन आहे की त्यांनी आपले पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेले व स्वलिखित लिखाण दि. ३० ऑगस्ट पर्यंत संपादक मंडळास दुवा क्र. १ या पत्त्यावर विरोपाने पाठवावे.

निक्षून दिलेल्या वेळेत काही काम पूर्ण करून द्यायचे म्हटले की ते करायला जाम मजा येते पण तेच जर प्रोजेक्टबद्दल नसून लिखाणाबद्दल वगैरे असेल तर मात्र माझे टाय टाय फिश होते.. ( संपादकांवर उपकार करते म्हणायचे दुसरे काय?!  ) तरीही बघते काही लिहिता येते का ते मनोगतच्या दिवाळी अंकासाठी. अर्थात माझ्या लेखनाची निवड होईल याची फाजील ( फाजीलच म्हणावे लागेल की माझी लेखनक्षमता बघता ! ) अपेक्षा मात्र बिल्कुलच नाही पण तरीही प्रयत्न करून बघायला काय जाते? इकडे नंबर नाही लागला तर संपादकांच्या नाकारताना मिळालेल्या टिप्पणींचा विचार करून ( मिळतील ना? ) सुधारणा करायचा प्रयत्न करून करायचे प्रसिद्ध लेखन इथेच .. आहे काय आणि नाही काय?! या निमित्ताने कोणी का असेना संपादन तर करेल..  अर्थात कुठेही पाठवायचे तर आधी लिहीणे महत्त्वाचे आहे म्हणा... ते करायला कधीचा मुहूर्त काढेन काढेन म्हणत होते तो या निमित्ताने काढतेच आज ! असो.

विशेष आवाहनाला प्रतिसाद करायची माझी पात्रता नाही ( कारण त्यात लागणारा कुठला गुण माझ्यात आहे ते मला गुगलावे लागेलसे दिसते ! ) पण तरीही मला करता येण्याजोगे काही काम असेल तर ते करायला मला जरूर आवडेल आणि ते मी करेनही.

इथे दिवाळीअंकासाठी जरूर अशा सर्वच प्रकारच्या कामांमध्ये सहभागी होण्यासाठी केलेले विनम्र आणि मुद्देसूद आवाहन पाहून त्यामागील सूत्रधारांचे कौतुक वाटते. तुमच्या सर्व कष्टांचे चीज होऊन एक सुरेख दिवाळी अंक वाचायला मिळो हीच प्रार्थना. मागच्या वर्षी इकडे काय उलथापालथ होऊन गेली याची उडतउडत कल्पना असली तरी बैजवार माहिती नसल्याने त्याबद्दल मी काय बोलणार? तसेही अशा हाय फंडू गोष्टींबद्दल बोलायला लागणारी प्राज्ञा ( धन्यवाद गटणे ! ) माझ्याकडे नाहीच.

एक सूचना मात्र जरूर करावीशी वाटत आहे मनोगत दिवाळी अंकासंदर्भात ती अशी की - या अंकात लेखन करणारे सर्व मनोगतीच असतात मग त्या त्या मनोगतीच्या व्यक्तिगत वाटचालीमध्ये मनोगत दिवाळी अंकातील लेखनही सामावता आले तर खूप बरे होईल. मागच्यावेळी मला खूप त्रास झाला. बघा काही करता आले तर...