दोन दिवसात चर्चा फारच मोठी झाली. मूळ मुद्दा बाजूला गेला आहे असे वाटते. त्यासंबंधात एक प्रश्न. समजा मला खालील वर्णनाचा संगणक विकत घ्यायचा आहे.
डेल इन्स्पिरॉनचे एक्सपीएस एम १३३० मॉडेल, १. ८३ जीगाहर्टझ फ्रिक्वेन्सी आहे. ड्युओ टी५५५० ची चिप आहे. २ * २ जीबी शेअर्ड रॅम आहे.
याचे "मराठीकरण" शक्य आहे का? असले तर ते वापरावे का? (याचे मराठीकरण करावे असे म्हणणाऱ्यांनी ते करून संगणक विकत घेऊन पाहावा. )
जर लाँन ऑन, लाँग ऑफ, मिडविकेट, स्केअरलेग, गली, पॉइंट हे सर्व चालू शकते तर वरच्या शब्दांनी काय घोडे मारले आहे?
हॅम्लेट