केदार,

कळत नकळतचे हे शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहे. त्या लोकसत्ता मध्ये स्तंभलेखन करतात. कधीमधी जर त्यांच्या लेखाच्या शेवटी त्यांनी आपला ई-पत्ता दिला असेल तर विपत्राने आपण त्यांना ही शंका विचारू शकता.

मला वाटते कवितेमध्ये एवढे स्वातंत्र्य असावे. यमक अलंकार वा छंद जुळण्यासाठी वा जुळवण्यासाठी अशी शब्दयोजना केली असेल तर त्याचा एवढा बाऊ करू नये. (ह. घ्या).. त्यातील मन पाऊल पाऊल.. स्वप्ने ओली.. हुळहुळणारी माती हे शब्द फार सुंदर वाटतात.

तरूण संगीतकार निलेश मोहरीर  यांनी दिलेली या गाण्याची चाल खूपच छान आहे.  सध्या माझ्या भ्रमणध्वनीचा रिंगटोन हेच गाणे आहे.