मुंबईहून जायचे तर पनवेल-पेण-माणगाव मार्गेच खूप जवळ व सोपे पडेल.
स्वतःचे सुमोसारखे वाहन असल्यास लोणावळ्यावरून अँबी वॅलीकडे जावे, आंबवणे गावाच्या थोडे अलिकडे उजवीकडे रस्ता जातो सालतर कडे त्याने जाता येते पण रस्ता फार खराब आहे.
दुसरा पर्याय म्हणजे लोणावळा घुसळखांब मुळशी असेही जाता येते, पण तोही रस्ता किती चांगला आहे याबद्दल शंका आहे.
तिसरा पर्याय, लोणावळा गावातून पवनेच्या बाजुने , काळे कॉलनी, पवना धरण मार्गे पौड व तेथून मुळशी. हा रस्ता सध्या चांगल्या स्थितीत आहे. पण बराच फेरा पडेल.