गोष्ट पाच रुपड्यांची आवडली... उगीच  वाचली, असे वाटले नाही. :). तुम्ही त्या संपादकाला महाठकासारखे भेटलात, हे बरेच झाले. (त्या संपादकांना मी ठक असे कसे बरे म्हणेन ? ). असो. लिहीत राहा, कुशाग्र. साहित्यक्षेत्रात तुम्ही काय भरीव कामगिरी करू शकाल,   त्याचा अंदाज घेण्याचे काम वाचकांवरच का नाही सोपवत तुम्ही ? वाचक तुमच्यावर नक्कीच अन्याय करणार नाहीत...

असो. खूप आवडला हा तुमचा अनुभव... असेच  लेखन (अशाच प्रकारचे असेल, असे नाही ;  पण इतरही) आणखीही वाचायलाही आवडेल. प्रतीक्षेत...

............


मोठ्या, पल्लेदार वाक्यांमध्ये तरी किमान विरामचिन्हांचा वापर करत जावा, ही नम्र विनंती