शब्दसखा,
सप्रेम नमस्कार

नचिकेत जोशी ? तुमच्याकडूनच ऐकत आहे मी हे नाव प्रथम....
........

तुमची काहीतरी गल्लत झालेली दिसते...
मी आजवर कोणत्याही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो नाही... :) माझी लायकी तरी आहे का ती ? काहीतरीच काय?  
तुम्ही दुसऱ्याच कुठल्यातरी प्रदीप कुलकर्णीविषयी बोलत आहात बहुधा... माझ्या नावाचे कितीतरी जण आहेत/ असतील पुण्यात...
........
तुम्हाला माझी ही कविता आवडली, ही बाब आणि तुमच्या शुभेच्छा या दोनच गोष्टी मला मोलाच्या वाटतात.... [ तुम्हाला माझी कविता नावडण्याचाही अधिकार आहे, हेही याच वेळी सांगून ठेवलेले बरे! :) ]
असो.
हार्दिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि तुमच्या गझललेखनातील पदार्पणाला माझ्या शुभेच्छा....