एवढ्या लेखासाठी केवळ तुमचेच २ प्रतिसाद आले. त्याबद्दल धन्यवाद. बाकी घोर निराशा झाली. कदाचित माझा लेख खास नसावा म्हणून कुणी ढुंकुनही पाहिले नसावे. असो..
मृगाचा पाऊस या शीर्षकाचा एक धडा होता मराठीच्या पुस्तकात... (रा. रं. बोराडे यांचा)...
मृग नक्षत्र लागलेले आहे... शेतकऱ्याची बायको तिकडे रानात... बाळापासून दूर. बाळ असते घरात. चंद्रमौळी झोपडीत. चंद्रमौळी असल्याने घर साहजिकच गळणारे... त्या आईची तगमग.... पावसाने जोर धरण्याआधाची घरी पोहोचायला हवे... लहान बाळापाशी असायला हवे... असा तो धडा. या धड्यासाठीचे चित्रही खूपच छान होते... डोक्यावर हारा (मोठी टोपली) घेतलेली बाळाची आई लगबगीने घराकडे निघाली आहे... झाकोळून आले आहे... ( सरींनाही सुरवात झाली असावी का ? ) या छोटेखानी लेखामुळे त्या धड्याची आठवण अशी सरीसारखी बरसून गेली मनातल्या मनात!
आपल्याला या लेखाच्या निमित्ताने जुनी आठवण झाली हेही नसे थोडके. हा धडा कोणत्या साली होता आणि कितवीच्या पुस्तकात? कारण मला फक्त बालकवींची कविता ६ वी ला होती ते आठवतेय.
शं बा दिक्षित यांचा खगोलशास्त्रावरील ग्रंथराज वाचलेला नाही. उपलब्ध असल्यास जरूर वाचेन.
पुनः एकदा धन्यवाद!
मंदार