सुंदर माहिती... आणि छायाचित्रे सुद्धा
तुमचा गणपतीपुळ्याबद्दलचा मागील लेख सुद्धा छान होता.
थोडेसे महाकाली मंदीरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या, प्रशस्त अश्या कनकादित्य
सूर्यमंदीरासंबंधी पण लिहा.
लिहिण्याची शैली पण छान आहे. पण एकच खटकले ते म्हणजे द्विरुक्ती. कोकणातले
मंदीर आणि स्वच्छ आहे असे लिहिणे. खरे तर हे पिवळा पीतांबर म्हणण्याजोगे आहे. कोकणातील मंदीरे स्वच्छच असतात.
माझे एक नाशिककर काका म्हणाले होते, त्र्यंबकेश्वराला जायचे म्हणताय, पुन्हा विचार
करा. तुम्हाला कोकणातल्या देवळांची सवय आहे म्हणून म्हणतोय. (ह. घ्या.)