चांगला लेख आहे. परदेशात आपल्या मानाने याबद्दल जागरूकता जास्त आहे. आपल्या इथे कुठल्यातरी चित्रपटात अजय देवगण म्हणतो तेच उत्तर सगळीकडे लागू पडते. "ऐसा ही हूं मै" सार्वजनिक स्वच्छता ज्या दिवशी आपल्या देशात येईल, तो खरेच सुदिन ठरेल.
माझ्या परिचयाचे एक इटालियन प्रोफेसर नुकतेच सपत्निक महिन्याभराचा भारत दौरा करून आले. मला सर्व फोटू दाखवल्यावर म्हणाले, "प्लीज, तुमच्या सरकारला ऐतिहासिक वास्तूंची काळजी घ्यायला सांगा. तुमच्या देशात पुरातन संस्कृतीचा इतका अमूल्य ठेवा आहे, तो जतन केला पाहिजे."
यावर मला काय उत्तर द्यावे सुचले नाही. तुम्हाला सुचतय?
हॅम्लेट