मराठी भाशा हि सध्या स्थित्यंतराच्या काळात आहे असे वाटते. बाळ जसं मोठं होतं तसे त्याला कपडे तोकडे पडू लागतात. त्यावर नव्या मापाचे कपडे शिवणं हाच उपाय योग्य होऊ शकतो. महाराष्ट्रात इतर भाशिक लोक येत होते येत आहेत, पण मराठी समाज त्यांच्यात म्हणावा तसा रुळला नाही. युरोपीय विचारवंतां प्रमाणे म्हणायचे झाले तर, जर आपल्याला आपली संमृद्धी जपायची असेल, टिकवायची असेल तर ती इतरांबरोबर वाटून घेण्यातच शहाणपण आहे. आता महाराष्ट्रातील ज्या भारतीयांना आपण आज परप्रांतीय मानतो त्यांच्या सोबत संमृद्धी वाटून घ्यायची कशी? हा प्रश्न उभा राहतो.
संमृद्धी वाटून घ्यायची जूनी पद्धत हि 'रोटी-बेटी' व्यवहार असायची. 'रोटी' साठी गुजरात्याकडे काम करणाऱ्याला गुजराती थोडीतरी यायलाच हवी. 'बेटी' पटवायची असेल तर ही तीची भाशा थोडीतरी समजायला हवी. उद्या नव्हे आज, ही पद्धतच मराठी समाजाला आपलीशी करावी लागेल, वा हळू-हळू ती रूळू लागेल असे वाटते. नाहीतरी, ह्या महाराष्ट्रातच 'परप्रांतियांपासून' किती बरं अलिप्त राहणार? राहता येणार?
शुद्ध-पवित्र च्या सर्व संकल्पना काळाच्या प्रवाहात वाहून जातील. व ह्या पद्धतीनेच ह्या महाराष्ट्रात नवी मराठी भाशा विकसीत होत जाईल. परंतु उद्याच्या काळात आपलं वेगळेपण दाखविण्यासाठी, ठसवण्यासाठी तरी महाराष्ट्राला स्वतः ची लिपी असायला हवी.
मी जो वर प्रतिसाद लिहिला होता त्यात उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगायची राहिली. मराठीकरण म्हणजे सामान्य जनता एखादा शब्द कस उच्चारते त्याचाच स्वीकार. ठेसन, शीक, बेस हे मराठी अपभ्रंशातून तयार झालेले शब्दच मराठी मानले गेले पाहीजेत. स्टेशन, बेस्ट हे इंग्रजी उच्चार आहेत हा विचार स्वीकारायला हवा. अपंभ्रंशावरच भर द्यायला हवा. जसं मध्य प्रदेशची 'चक्री' आणि 'शक्करपारे' महाराष्ट्रात आल्यावर अनुक्रमे 'चकली' व 'शंकरपाळी' होतात तशीच.
ग्रामीण मराठीजन एखादा शब्द कसा उच्चारतात, एखादा नवीन ऐकलेल्या शब्दात कसा बदल घडवतात त्या अपंभ्रंशाचा अभ्यास होऊन त्यावर आधारीत आराखडा तयार व्ह्यायला हवा. जो मूठभर बुद्धिमत्तांना नवे शब्द कुठल्या साच्यातून घडवायचे? हे समजण्यास सोपे व मार्गदर्शक होतील.